नांदेडला होणार आंतरराष्ट्रीय परिषद

फोटो
फोटो

नांदेड : महात्मा गांधी मिशन संचलीत एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणकशास्त्र अभियांत्रिकी विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (लोणेरे) यांच्या वतीने ता. नऊ ते ता. ११ जानेवारी दरम्यान तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत विविध देशातील ८० संशोधक सहभागी होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष कमलकिशोर कदम यांनी दिली.

माजी मंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष कमलकिशोर कदम यांनी बुधवारी (ता.आठ) एमजीएम महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी त्यांच्यासोबत अमेरिकेच्या ‘इस्ट कॅरोलीन’ विद्यापीठाचे प्रा. डॉ. व्हेंकट गुडीवडा, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. गीता लाठकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्रा. डॉ. ब्रिजेश अय्यर, परिषदेच्या समन्वयक डॉ. अर्चना राजुरकर, डॉ. गोविंद हंबर्डे, प्रा. गणेश जोशी यांची उपस्थिती होती. 
  
येथे क्लिक करा - कोल्हापूरच्या तरुणांची उदगीर ते पानिपत शौर्ययात्रा सुरू : पाहा Video

असा आहे परिषदेचा उद्देश
या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संगणकशास्त्राचे तज्ज्ञ, अभियंते, संशोधक, विद्यार्थी व व्यवसायिक अभियंते यांना एकत्र अणून संगणकशास्त्र अभियांत्रिकी विषयावरील नवीन संशोधन प्रकाशित करणे व त्यावर चर्चा करणे, असा प्रमाणिक उद्देश असून, चर्चेअंती परिषदेतील सर्व निष्कर्ष प्रकाशित करणे असा आहे. या परिषदेसाठी ‘अप्लाईड कम्प्युटर व्हीजन’ आणि ‘इमेज प्रोसेसिंग’ तसेच ‘नेक्स्ट जनरेशन इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग सिस्टीम’ या दोन मुख्य विषयावरील संगणकशास्त्रीय संशोधनावर शोधनिबंध सादर करण्यात येणार आहेत.

६४ पेपरचे होणार वाचन 
या संशोधकांचा उपयोग मानवी जीवनातील शेती, उद्योग, वैद्यकीय निदान, स्वंयचलित वाहने, जैव तंत्रज्ञान, अंतराळ तंत्रशास्त्र संरक्षण विषयक या सह विविध क्षेत्रातील वेगाने सुरु असलेली तंत्रज्ञानातील प्रगती लक्षात घेऊन त्या दृष्टीने विषयाची निवड करण्यात आली आहे. परिषदेत १६४ संशोधकांनी पेपरचे वाचन करण्यासाठी नोंदणी केली होती. त्या पैकी निवडक अशा ६४ संशोधकांच्या पेपरचे वाचन होणार आहे.

हे ज्येष्ठ संशोधक करणार मार्गदर्शन 
ही परिषद दर्जेदार व लक्षवेधी व्हावी, यासाठी देशभरातील संशोधकांनी सहभाग घेतला असून, यात अमेरिकेच्या इस्ट करोलीन विद्यापीठाचे प्रा. डॉ. व्हेंकट गुडीवडा, युनिव्हर्सिटी आॅफ साऊथ डकोटाचे प्रा. डॉ. के. सी. संतोषी, अमेरीकेच्या एम.आर. आय. लॅबचे डॉ. अजित अब्राहम, म्हैसूर विद्यापीठाचे डॉ. डी. एस. गुरु, बंगळूरच्या निमोचे सीईओ अर्जुन दास, दिल्ली आयआयटी विश्वविद्यालयाचे डॉ. सुमंत दत्त रॉय, चंदीगड रोपर आयआयटीचे डॉ. सुब्रम्हण्यम मुराला हे विशेष मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ कुलगुरु डॉ. व्ही. आर. शास्त्री, आयआयटी मुंबईचे एम. टी. एस, पद्मक्षी डॉ. डी. बी. फाटक तसेच डेहराडून ग्राफीक इरा युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. आर. सी. जोशी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com