नांदेडात ७० वर्षाच्या आजीच्या या अवयवावर लॅपरोस्कोपीद्वारे शस्त्रक्रिया

फोटो
फोटो

नांदेड : शस्त्रक्रिया शब्द तसा सर्वांच्या अंगवळणी पडला आहे. त्यामुळे जन्मलेल्या बाळापासून ते अगदी वयोवृद्ध व्यक्तींच्या अनेक व्याधीवर अत्याधुनिक तंत्राच्या साह्याने विना टाक्याची शस्त्रक्रिया केली जाते. त्यामुळे डॉक्टर्सना सुद्धा अवघडातील अवघड शस्त्रक्रिया करणे जुजबी वाटते. मात्र हीच शस्त्रक्रिया जर एखाद्या सत्तरीकडे झुकलेल्या व्यक्तीवर करायची म्हटल्यास त्यात अनेक गोष्टींची खबरदारी घ्यावी लागते. हे तितकेच खरे आहे. अशा पद्धतीच्या शस्त्रक्रिया करताना त्यात अनेक धोके पत्कारावे लागतात.

असे झाले निदान
होय... असाच धोका नांदेडच्या विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील डॉक्टर्सनी यशस्विरित्या पार केला आहे. विशेष म्हणजे गुद्दद्वाराच्या कर्करोगाची लॅपरोस्कोपीद्वारे करण्यात आलेली ही मराठवाड्यातील पहिलीच यशस्वी शस्त्रक्रिया असल्याचे डॉक्टर्सकडून सांगण्यात येते. लोहा तालुक्यातील माळकेवाडी गावच्या सत्तरवर्षीय आजीबाईंना प्रातः विधीसाठी गेल्याने रक्तस्त्राव होत असे. तीन महिण्यापूर्वी त्या विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. रुग्णालयातील डॉक्टर्सनी त्यांच्या आवश्यक त्या तपासण्या केल्यानंतर त्यांना गुद्दद्वाराचा कर्करोग असल्याचे निष्पन्न झाले होते. 

नियोॲडजुअन’ थेरपी देण्याचा निर्णय

यावेळी मात्र कर्करोगाची गाठ मोठी असल्याकारणाने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे म्हणजे रुग्णाचा जीव धोक्यात टाकणे असेच होते. याला पर्याय म्हणून तज्ज्ञ डॉक्टर्सनी ‘नियोॲडजुअन’ थेरपी देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आजीबाईंचे वय आणि टाक्याच्या शस्त्रक्रियेचा पुढील होणारा परिणाम व त्यातील गुंतागुंती लक्षात घेता दुर्बिनीद्वारेच शस्त्रक्रिया व्हावी यावर सर्व तज्ज्ञ डॉक्टर्सचे एकमत झाले. तेंव्हा कुठे या शस्त्रक्रियेस डॉक्टर्सच्या टिमला यश आले. 

मराठवाड्यातील पहिलीच यशस्वी शस्त्रक्रिया


ही शस्त्रक्रिया शनिवारी (ता.चार) जानेवारीला पार पडली. या पूर्वी अशी शस्त्रक्रिया झाली नाही असे नव्हते, परंतु इतक्या वयस्क व्यक्तीवर अशा पद्धतीची ही मराठवाड्यातील पहिलीच यशस्वी शस्त्रक्रिया मानली जात आहे. यासाठी शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. गंगाधर अनमोड, डॉ. विद्याधर केळकर, डॉ. अनिल देगावकर, डॉ. प्रमोद साळवे आणि डॉ. आशिष चव्हाण यांच्यासह डॉ. अब्दुल रहेमान तांबोळी, डॉ. प्रमोद हंबर्डे आणि डॉ. जळबा मोरे यांचे योगदान होते. 

कुटुंबाने मानले डॉक्टर्सचे आभार


घरातील एखादी व्यक्ती भयंकर व्याधीने त्रस्त असल्यास ते कुटुंब मानसिकदृष्ट्या खचते. आणि अशा खचलेल्या कुटुंबियातील सदस्यांवर उपचार करुन त्या रुग्णास बरे करुन त्यांना सावरणाऱ्या डॉक्टर्सना लोक देव मानतात. अगदी अशाच पद्धतीची अवस्था सत्तर वर्षीय आजीबाईंच्या कुटुंबातील सदस्यांची होती. मात्र अनेक रुग्णालयात अपयश आलेल्या आजीबाईंवर यशस्विरित्या शस्त्रक्रिया पार पडल्याने कुटुंबाने डॉक्टर्सच्या टिमचे आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com