esakal | केंद्राकडून तपास यंत्रणांचा वापर केवळ ब्लॅकमेलिंगसाठी ; राजू शेट्टींची टीका | Osmanabad
sakal

बोलून बातमी शोधा

Raju Shetty

केंद्राकडून तपास यंत्रणांचा वापर केवळ ब्लॅकमेलिंगसाठी ; राजू शेट्टींची टीका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : ‘‘गेल्या पाच वर्षांत प्राप्तिकर विभाग आणि इतर संस्थांनी जिथे छापे टाकले त्यातून काय निष्पन्न झाले याची माहिती द्यावी. छापे पडतात; मात्र त्याच पुढे काही होत नाही. ब्लॅकमेल करण्यासाठी छाप्यांचा वापर केंद्र सरकारकडून केला जात आहे; याची आता सामान्य जनतेलाही खात्री पटली आहे’’, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी येथे शनिवारी (ता. पाच) पत्रकार परिषदेत केला.

नवरात्रोत्सवानिमित्त शेट्टी हे राज्यातील प्रमुख शक्तिपीठाच्या ठिकाणी जागरयात्रा घेत आहेत. ही यात्रा उस्मानाबाद जिल्ह्यात आल्यानंतर त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला. यावेळी शेट्टी यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. शेट्टी म्हणाले, ‘‘पाच वर्षांत प्राप्तिकर व इतर विभागांनी छापे टाकले त्याचे पुढे काय झाले? त्यात काय सापडले? याची माहिती जनतेला मिळायला हवी. केंद्र सरकार सीबीआय, ईडी सारख्या घटनात्मक संस्थांचा वापर राजकीय बदला घेण्यासाठी करत आहे. यामुळे या संस्थांचा आदर कमी झाला आहे. भाजपच्या घोटाळेबाज नेत्यांवर धाडी का नाही, काही घोटाळेबाज भाजपमध्ये आले ते पवित्र झाले का?’’ असा प्रश्नही शेट्टी यांनी केला.

केंद्र सरकारने सोयाबीनचे दर पाडले. शिवाय आता एफआरपीच्या तुकडे करून ऊसउत्पादकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केंद्राकडून झाल्याचे शेट्टी यांनी म्हटले. विरोधी बाकावर बसले की शेतकऱ्यांचा कळवळा येतो. सत्तेत गेल्यानंतर त्यांच्याविरोधात भूमिका घेणाऱ्यांना आता धडा शिकविणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

loading image
go to top