esakal | ऊसतोड मजुरांच्या बैठकीला शरद पवारांना बोलवा, समन्वय संघर्ष समितीची भूमिका
sakal

बोलून बातमी शोधा

1Sharad_Pawar_10

ऊसतोड मजुरांच्या दरवाढ प्रश्नी संप सुरु असून आतार्यंत चार वेळा साखर संघासोबत बैठका झाल्या. मात्र, त्यात कुठलाही तोडगा नाही. आगामी बैठकीसाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह शिक्षणमंत्री, कामगार मंत्री यांना बोलवावे, अशी भूमिका ऊसतोड मजूर-मुकादम समन्वय संघर्ष समितीने शनिवारी (ता. २४) पत्रकार परिषदेत मांडण्यात आली.

ऊसतोड मजुरांच्या बैठकीला शरद पवारांना बोलवा, समन्वय संघर्ष समितीची भूमिका

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : ऊसतोड मजुरांच्या दरवाढ प्रश्नी संप सुरु असून आतार्यंत चार वेळा साखर संघासोबत बैठका झाल्या. मात्र, त्यात कुठलाही तोडगा नाही. आगामी बैठकीसाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह शिक्षणमंत्री, कामगार मंत्री यांना बोलवावे, अशी भूमिका ऊसतोड मजूर-मुकादम समन्वय संघर्ष समितीने शनिवारी (ता. २४) पत्रकार परिषदेत मांडण्यात आली.


तोडगा निघेपर्यंत मजूरांना कोयता घेऊ देणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २० टक्के आणि गेल्या वर्षी दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी पाच टक्के दरवाढीची घोषणा केली. मात्र, ऊसतोड मजुरांना अद्यापही रक्कम मिळाली नाही असे सुशिला मोराळे यांनी सांगितले.

स्वाभीमानीच्या सारिका गायकवाड यांनी बीड पालिकेचा जेसीबीच फोडला

आता पर्यंतच्या बैठकांमध्ये दरवाढीबाबत ठोस निर्णय नसल्याने संप सुरु असून भविष्यात आंदोलन तीव्र करू असेही यावेळी सांगितले. आगामी बैठकीसाठी शरद पवार, शिक्षणमंत्री, कामगारमंत्री, सहकारमंत्री यांना आमंत्रित करावे. तरच काहीतरी तोडगा निघेल असा विश्वास मोराळे यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला मोहन जाधव, दादासाहेब मुंडे, संजय तांदळे यांची उपस्थिती होती.

संपादन - गणेश पिटेकर