esakal | स्वाभीमानीच्या सारिका गायकवाड यांनी बीड पालिकेचा जेसीबीच फोडला
sakal

बोलून बातमी शोधा

JCb manse.jpg

कचऱ्यामुळे रस्ता नाही दुर्गंधीही; सांगूनही पालिका ऐकत नसल्याने प्रकार

स्वाभीमानीच्या सारिका गायकवाड यांनी बीड पालिकेचा जेसीबीच फोडला

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : पालिका डंपिंग ग्राऊंडवर कचरा टाकते. पण, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्याच मालकीच्या शेतात जायला रस्ता नाही. सर्वत्र दुर्गंधीही पसरलेली आहे. सांगूनही उपाय योजना होत नसल्याने शनिवारी (ता. २४) स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सारिका गायकवाड यांनी पालिकेची जेसीबीच्या केबीनच्या काचा लाकडाच्या दंडकुक्याने चक्काचुर केल्या.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

बीड नगर पालिकेचे नाळवंडी नाका भागात डंपींग ग्राऊंड आहे. मात्र, कुठेही कचरा टाकण्याची सवयच सफाई विभागाला जडलेली आहे. डंपिंग ग्राऊंडमध्येही सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे आहेत. जाणाऱ्या वाहनांनाही एक मार्ग नाही. त्यांना हवे तेथून शेतातून ही वाहने जातात. सध्या पावसामुळे चिखल असल्याने या वाहनांच्या येण्याजाण्याने शेतकऱ्यांना त्यांच्याच शेतात जाणे कठीण आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यातच या कचऱ्यामुळे दुर्गंधीने शेतकरी त्रस्त आहेत. यावर मार्ग काढावा, अशी अनेक वेळा मागणी करुनही दुर्लक्ष होत होते. मग, शनिवारी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सारिका गायकवाड या भागात गेल्या. हाती दंडूका घेऊन येथे असलेल्या जेसीबीवर चढल्या आणि केबीनच्या काचांचा चक्काचुर केला. आज जेसीबी फोडली भविष्यात पालिकेच्या दालनांचीही अशीच अवस्था करु असा इशारा सारिका गायकवाड यांनी दिला.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)