
Latur Crime | चाकूरमध्ये बनावट दारू तयार करण्याचे साहित्य जप्त
चाकूर (जि.लातूर) : बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य एका गोदामात असल्याची माहिती मिळाल्यावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकला असता लाखो रूपये किंमतीचे जवळपास पाच टेम्पो साहित्य सापडले आहे. यातून बनावट दारूचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. शहरातील लातूर (Latur) - नांदेड रस्त्यावरील महाविद्यालयासमोर एक लाॅज आहे. हा लाॅज अनेक दिवसांपासून बंद आहे. या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मंगळवारी (ता.पाच ) दुपारी छापा टाकला. या लाॅजमधील गोदामात बनावट दारू तयार करण्यासाठी लागणाऱ्या बाटल्या, स्टीकर, सील, रिकामे खोके हे साहित्य मोठ्या प्रमाणात आढळून आले. (Items Of Making Fake Liquor Seized In Chakur Of Latur)
हेही वाचा: रोहित तू बिनधास्त जा, नितीन गडकरींनी आबांच्या लेकाला दिला शब्द
दोन दिवसांपासून पथकातील कर्मचारी यावर लक्ष ठेऊन होते. बनावट दारू तयार करण्यासाठी हे साहित्य जमा केले असल्याची अंदाज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (Excise Department) अधिकाऱ्यांचा आहे. याचे मोजमाप करून हे साहित्य जप्त करण्यात आले आहे. जवळपास पाच टेम्पो भरतील एवढे हे साहित्य असून रात्री उशीरापर्यंत याची मोजणी सुरु होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक गणेश बारजगे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.
हेही वाचा: पाकिस्तानसाठी रशिया आला धावून, अमेरिकेवर केला मोठा आरोप
हे साहित्य कोणाचे आहे याबाबत खात्री करून गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यातून बनावट दारू विक्रीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Web Title: Items Of Making Fake Liquor Seized In Chakur Of Latur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..