

Jalna Accident
sakal
जाफराबाद : अद्रक काढणीसाठी बदनापूर तालुक्यातील चिखली येथून टेंभुर्णी कडे राजूर मार्गे येणाऱ्या मजुरांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला गुरुवारी (ता.१८) सकाळी अपघात झाला. यामध्ये टेम्पो व स्कुटीची धडक होऊन स्कुटी चालक रमेश किसन जाधव (रा. टेंभुर्णी) जागीच ठार झाले तर मजुराचा टेम्पो पलटी झाल्याने टेम्पोतील मध्यप्रदेश मधील 18 मजूर जखमी झाले आहेत.