ग्रामपंचायतला पडली 'बारा' मते... मग पठ्ठ्याने बॅनर लावून मानले मतदारांचे 'जाहीर आभार'

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 21 January 2021

सोमवारी लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बऱ्याच प्रस्थापितांना धक्का बसला होता

जळकोट (लातूर): 'आम्ही जातो आमच्या गावा... आमचा राम राम घ्यावा, समाजानं धक्कारलं...गावानं नाकारलं...पण आम्हाला देश स्विकारणार' ही कोणत्या सिनेमातली वाक्य नसून ही आहेत ग्रामपंचातीच्या निवडणुकीत १२ मते मिळाल्यानंतर उमेदवाराने मानलेले मतदारांचे आभार. असे डायलॉग असलेला डिजीटल ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराने लावला आहे. 

जळकोट तालुक्यातील कोनाळी डोंगर या गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक विकास शिंदे या युवकाने लढवली होती. शिंदेंचा निवडणुकीत पराभव होऊनही मतदारांचे आभार मानले आहेत. 'आमच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या बारा मतदारांचे जाहीर आभार' असा डिजीटल शिंदे यांनी गावात लावला आहे.

'औसा - नांदेड ते वारंगाफाटा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरु'

या डिजीटलवर अजून बरेच डायलॉग लिहले होते. त्यामध्ये, ना जातीसाठी... ना धर्मासाठी... आमचा लढा फक्त मातीसाठी...' अशा डायलॉगचा सामावेश होता. निवडणुकीत हारल्यानंतर असा फलक लावून आभार मानणारा विकास शिंदे हा पहिलाच उमेदवार असेल.

सोमवारी लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बऱ्याच प्रस्थापितांना धक्का बसला होता. काही ठिकाणी नवखे उमेदवार निवडूण आले तर काही ठिकाणी महिलाराज दिसले. तर बऱ्याच दिग्गजांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalkot breaking news latur news gram panchayat election