esakal | होकर्णा पाझर तलाव फुटण्याचा धोका; दुरूस्तीची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

होकर्णा पाझर तलाव फुटण्याचा धोका; दुरूस्तीची मागणी

होकर्णा पाझर तलाव फुटण्याचा धोका; दुरूस्तीची मागणी

sakal_logo
By
विवेक पोतदार

जळकोट : होकर्णा (ता.जळकोट) येथील पाझर तलाव क्रमांक एक (मुखेडे यांच्या शेताजवळ) तुडुंब भरला असून तलाव फुटण्याचा धोका असल्याने सांडव्यासमोरचा भाग मंगळवारी (ता.७) ग्रामस्थांनी खोदून पाण्याला तात्पुरता रस्ता करुन दिला. त्याची प्रशासनाने कायमस्वरूपी दुरूस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या तालुक्यात सोमवारी (ता.६) रात्रभर व मंगळवारी (ता.७) दिवसभर पडलेल्या सततच्या पावसाने जलसाठ्यात वाढ झाली असून आणखी पाऊस पडला तर हा तलाव फुटण्याचा धोका आहे. गावातील शेतकरी लक्ष्मण तगडमपल्ले,माजी सरपंच दिगंबर पाटील,बालाजी पाटील,रमेश मुखेडे,संतोष डोणगावे,बाबूराव देवकत्ते,डोणगावे आदिंनी एकत्र येऊन जेसिबीने सांडव्यासमोरचा भाग खोदून पाण्याला मंगळवारी (ता.७) रस्ता करुन दिला.

तलाव फुटल्यास पिकांचे,शेतजमिनीचे मोठे नुकसान होऊ शकते. जिवित व वित्त हानी टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने या तलावाची दुरूस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

हेही वाचा: चांदीवाल आयोगाकडून परमबीर सिंह यांच्या विरोधात जामिनपात्र वॉरंट जारी

दुरुस्ती आवश्यक

तलाव भरला असून मागे १९८३ मध्ये हा तलाव फुटला होता. आणखी पाऊस पडला तर तलाव फुटण्याचा धोका असून गावात पाणी शिरु शकते तसेच पिकासह शेतीचे नुकसान होऊ शकते. तेंव्हा तात्काळ हा तलाव प्रशासनाने दुरुस्त करावा.

-लक्ष्मण तगडमपल्ले (सामाजिक कार्यकर्ते)

loading image
go to top