esakal | जालना: महिनाभरात अतिवृष्टीने अडीच लाख हेक्टर क्षेत्र बाधित । Marathwada
sakal

बोलून बातमी शोधा

जालना: महिनाभरात अतिवृष्टीने अडीच लाख हेक्टर क्षेत्र बाधित

जालना: महिनाभरात अतिवृष्टीने अडीच लाख हेक्टर क्षेत्र बाधित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जालना : जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यामुळे खरीप पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार मागील महिनाभरात तब्बल दोन लाख ४८ हजार ७२६.९२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकले आहे.

हेही वाचा: यवतमाळ : बाळ विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई केल्याने मोठा अनर्थ टळला

जिल्ह्यात यंदा जुलै महिन्यांपासून जोरदार पावसाला सुरवात झाली. त्यानंतर सातत्याने जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका बसला. सोमवारी (ता.२७) व मंगळवारी (ता.२८) जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक शेतांमध्ये सध्या ही पावसाचे पाणी साचले असून सोयाबीन, कपाशी पिकासह, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.

तर हजारो शेतकऱ्यांची शेती खरडून गेली आहे. परिणामी ता. एक जुलै ते ता. २८ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात चार लाख ९० हजार ४९९.५० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. तर मागील महिनाभरात अतिवृष्टीने दोन लाख ४८ हजार ७२६.९२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. आता शेतकऱ्यांची मदार शासकीय मदतीवर आहे.

ता.२८ सप्टेंबरपर्यंत तालुकानिहाय झालेले नुकसान (क्षेत्र हेक्टरमध्ये)

तालुका- शेतकरी संख्या- एकूण बाधितक्षेत्र- फळपीक

जालना ६४,१०८ - ५०,१५३.५२ - ३,१२८

बदनापूर ५०,७५० - ४५,५५१.५५ - ४,०५७.६५

भोकरदन ५७,२१९ - ४७,०२३.६५ - २,३५१.१८

जाफराबाद ३५,००० - २८,४६० - ५०

मंठा ३७,०५१ - ४२,२१० - ००

परतूर ५२,०५० - २५,३६८ - ००

अंबड ३,००० - २,००० - २५०

घनसावंगी ५२,२०० - ८,००० - ८००

एकूण ३,०४,३७८ - २,२८,७२६.९१ - १०,६३६.८३

जुलै ते सप्टेंबर दरम्यानचे नुकसान (बाधितक्षेत्र हेक्टरमध्ये)

महिना बाधित शेतकरी संख्या एकूण क्षेत्र फळपीक क्षेत्र

जुलै ५,३७३ - २९००.४५ - ११.५

ऑगस्ट ३,२६,८२३ - २,३८,८७२.१३ - १८,००३.२७

सप्टेंबर ३,०४,३७८ - २,२८,७२६.९१ - १०,६३६.८३

एकूण ६,३६,५७४ - ४,९०,४९९.५ - २८,६५१.१५

loading image
go to top