Jalna Accident
Jalna Accidentesakal

कार-रिक्षाचा भीषण अपघात, तीन ठार अन् चार जण गंभीर जखमी

अशियाबी कुरेशी या सासरे अब्दुल समद कुरेशी यांच्यासह आपल्या तीन मुलांना घेऊन माहेरी आल्या होत्या.
Published on

आष्टी (जि.जालना) : रिक्षा व कारची समोरासमोर धडक होऊन गुरूवारी (ता.२८) झालेल्या भीषण अपघातात तीन ठार, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मंठा येथील महिला अशियाबी कुरेशी (वय ३०) या सासरे अब्दुल समद कुरेशी (वय ५८) यांच्यासह आपल्या तीन मुलांना घेऊन आष्टी येथे माहेरी आल्या होत्या. गुरूवारी माहेरच्या नातेवाईकांना भेटून त्या मंठाकडे परत जाण्यासाठी रिक्षाने परतूरकडे (Accident In Jalna) निघाल्या होत्या. परतूर-आष्टी रस्त्यावरील आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या काही अंतरावरच परतूरहून येणाऱ्या कारची आणि रिक्षा जोरात धडक झाली. या धडकेनंतर रिक्षा दोन-तीन पलट्या घेऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावर (Jalna) आदळली.

Jalna Accident
जालन्यात बुलडाणा बँकेवर दरोडा,एक कोटींपेक्षा अधिक मुद्देमाल लुटला

या अपघातात आशिया कुरेशी ( वय ३०), अब्दुलसमद कुरेशी (वय ५८), जिकरा कुरेशी (वय ४) हे तिघे जण ठार झाले. तर अदनान कुरेशी (वय ८), अनस कुरेशी (वय ६) यासह कार चालक योगेश शिंदे (वय २७) व रिक्षा चालक सतीष खंदारे आदी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी रुग्णांना जालना येथे रूग्णलायात दाखळ करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परतूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, आष्टीचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे, पोलिस उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com