परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा अवेळ शेवट, तिघांचा मृत्यू | Jalna Accident | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalna Accident News
परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा अवेळ शेवट, तिघांचा मृत्यू

परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा अवेळ शेवट, तिघांचा मृत्यू

sakal_logo
By
सुभाष बिडे

घनसावंगी (जि.जालना) : अंबडहून घनसावंगीकडे (Ghansawangi) टायपिंगच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या कारच्या चालकाचा ताबा सूटून झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी (ता.२६) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. अंबडहून घनसावंगीकडे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी घेऊन येणारी चार कार (एमएच २१ एचएम ०८८९) ही घनसावंगीकडे भरधाव वेगाने येत असताना पेट्रोल पंपाजवळ (Accident In Jalna) चालकाचा कारवरील ताबा सुटला. कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत सिमेंट पोलला धडकून अपघात झाला. त्यामधील जखमींना उपचारासाठी जालना येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले असता सुनिल मदन जाधव (रा.लालवाडी), आरती मिरकड (रा.अंबड), वंदना सुरेश राजगुरु (रा.राहेरा) तीन विद्यार्थ्यांचा मृत झाला. (Jalna)

हेही वाचा: डाॅक्टरांच्या हालगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू, नातेवाईकांचा आक्रोश

चालक योगेश धोंडीराम राऊत यांच्यावर जालना येथे उपचार चालु असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी घनसावंगी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पतंगे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून उपचारासाठी जालन्याला पाठविले.

loading image
go to top