डाॅक्टरांच्या हालगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू, नातेवाईकांचा आक्रोश | Latur News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Latur News
डाॅक्टरांच्या हालगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू, नातेवाईकांचा आक्रोश

डाॅक्टरांच्या हालगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू, नातेवाईकांचा आक्रोश

sakal_logo
By
सचिन शिवशेट्टे

उदगीर (जि.लातूर) : येथील सामान्य रुग्णालयातील (Health) डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रसुतीनंतर उपचारात डाॅक्टरासह परिचारिकेने दुर्लक्ष केल्यामुळे गुरुवारी (ता.२५ ) कोमल समाधान कोलेवाड (वय २८ ) या महिला रुग्णाचा मृत्यु झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकाने केला आहे. डोंगरज (ता.चाकुर) येथील रूग्ण प्रसुती वेदना होत असल्यामुळे गुरुवारी सकाळी ६ वाजता उदगीरच्या (Udgir) सामान्य रूग्णालयात प्रसुतीसाठी दाखल केले होते. सकाळी ८ वाजता प्रसुतीनंतर जास्त थंडी वाजत असल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी परिचारिकेस उपचार करण्यास कळविले असता परिचारिकेची अरेरावी भाषा ऐकुण नातेवाईक (Latur) भिती पोटी शांत बसले. या वेळी एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. यावेळी रुग्णास पुढील उपचारासाठी सांगितले असता त्यांनी टाळाटाळ केली.

हेही वाचा: BJP | भाजपच्या जाहिरातीत चीनच्या विमानतळाचे फोटो !

रुग्णालयात सबंधीत डाॅक्टर उपस्थित नसल्यामुळे नातेवाईकांनी रुग्णाला लातुरला घेऊन जाणार असल्याचे सांगितले. रुग्णाला जास्त त्रास होत होता. बर्‍याच वेळ गेल्यानंतर दुपारी रुग्णाचा तडफडुन मृत्यु झाला. घाबरलेल्या अवस्थेतील नातेवाईकांनी रुग्णालयात आक्रोष करत शहर पोलीस ठाणे गाठुन डाॅक्टरांनी योग्य वेळी उपचार न झाल्यामुळे रूग्णाचा मृत्यु झाला आहे. मृत्युस जबाबदार असणार्‍या डाॅक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी मृत रुग्णाच्या पती समाधान कोलेवाड यांनी केली.

लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात इन काॅमेरा शवविच्छेदन

इन काॅमेरा शवविच्छेदन करुन रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी नातेवाईकाने तहसिलदार यांच्याकडे केली होती. त्यामुळे उदगीरच्या रुग्णालयात इन काॅमेरा शवविच्छेदनाची सोय नसल्यामुळे मृत महिलेचा शव पोलिस बंदोबस्तात लातुरच्या वैद्यकीय महाविद्यालयाला रात्री उशीरा पाठवण्यात आले होते. शुक्रवारी (ता.२६ ) दुपारी २ वाजता तज्ज्ञ डाॅक्टरांची समितीच्या उपस्थितीत शवविच्छेदन करुन मृत महिलेचा मृतदेह नातेवाइकांकडे सुपुर्द करण्यात आला.

loading image
go to top