Jalna : आषाढ एकादशीनिमित्त भाविकांची मांदियाळी

आनंदीस्वामी महाराज पालखी सोहळा
पालखी
पालखी sakal

जालना : प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या श्री. आनंदी स्वामी महाराज यांचा आषाढी एकादशीनिमित्त गुरूवारी (ता.२९) पालखी सोहळा पार पडला. यावेळी लाखो भाविकांनी दर्शन घेतला. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आला होता.

सुमारे तीनशे वर्षापासून श्री.आनंदीस्वामींचा मठ जालना शहरात आहे. आषाढ महिन्यात येथे मोठा उत्सव होतो. आषाढ एकादशीनिमित्त मागील सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमासह कीर्तन सोहळे पार पडला. शिवाय सात दिवस श्री. आनंदीस्वामी महाराज यांना विविध रूप देण्यात आले होते. गुरूवारी (ता.२९) आषाढी एकादशीनिमित्त पहाटे श्री. आनंदी स्वामींच्या समाधीला महाभिषेक व मानाचे पाच अभंग म्हणण्यात आले.

पालखी
Jalna : जालना जिल्हा बॅंकेची निवडणूक लांबणीवर

त्यानंतर आषाढी एकादशीनिमित्त रविवारी सकाळी सजविलेल्या पालखी मिरवणुकीस मंदिरातून सुरवात झाली आहे. ही पालखी मिरवणूक शनि मंदिर, कचेरी रोड, गणपती गल्‍ली, कुच्चर वटा, बाजार पोलिस चौकी, कैकाडी मोहल्ला, कसबा, विठ्ठल मंदिर, गांधी चमन मार्गे आनंदी स्वामी गल्‍लीतून पालखी पुन्हा मंदिरामध्ये दाखल झाली.

पालखी
jalna : जम्बो प्रकल्पांचे शहर म्हणून जालन्याची राज्यात ओळख निर्माण आहे

दरम्यान, पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी फराळ, चहा, पाण्याची भाविकांनी व्यवस्था केली होती. तर पालखी मार्गावर हजारो भाविकांनी श्री. आनंदीस्वामी महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. दरम्यान, पालखी सोहळ्यात अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिवाय वाहतूक मार्गात ही बदल करण्यात आला आहे.

ढोल पथकाने वेधले लक्ष

श्री. आनंदी स्वामी महाराज यांच्या पालखी सोहळ्यात ढोल पथकाने भाविकांचे लक्ष वेढले. यावेळी ढोल पथकासह मल्लखांब पथकाने आपल्या कलाकृतीतून वातावरणात उत्साह आला होता.

विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गर्दी

आषाढी एकादशीनिमित्त शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र पाहावयास मिळाले. भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. ज्यांना पंढरपूरला जाता आले नाही, अशा भाविकांनी शहरातील मंदिरात विठुरायांचे दर्शन घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com