Jalna : जालना जिल्हा बॅंकेची निवडणूक लांबणीवर

शासनाकडून आदेश, आता सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा
बँके
बँकेsakal

जालना : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. यासंदर्भात सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्रालयाचे कार्यासन अधिकारी अनिल चौधरी यांनी बुधवारी (ता.२८) रात्री उशिरा आदेश काढले आहेत.

जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. छाननीअंती तीन जागा बिनविरोध झाल्याचे चित्र होते. तर १४ जागांसाठी आता ३८ उमेदवारांचे ५५ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले होते.

बँके
jalna : जम्बो प्रकल्पांचे शहर म्हणून जालन्याची राज्यात ओळख निर्माण आहे

जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्व राजकीय नेत्यांकडून प्रयत्न सुरू केले होते. मात्र, यात  सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्रालयाचे कार्यासन अधिकारी अनिल चौधरी यांनी बुधवारी (ता.२८) रात्री उशिरा निवडणुका पुढे ढकलल्याचे आदेश काढले आहेत. ता.३० जूननंतर राज्यात मोठ्या प्रमाण पाऊस होणार आहे. त्यामुळे ता.३० सप्टेंबरपर्यंत निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, असे आदेशात नमूद आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com