

Jalna News
sakal
जालना : शहरातील भवानीनगर येथील दुचाकी जाळल्याच्या संशयावरून सात दिवसांपूर्वी झालेल्या मारहाणीत सागर भगवान आगलावे (वय २३, रा. भवानीनगर, जालना) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात तीन जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.