
जालना : आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या जिल्ह्यात विविध शहरांसह ग्रामीण भागात ठिकठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र अजूनही पात्र नागरिक मोठ्या प्रमाणावर लसीकरणासाठी येत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात २ लाख ८८ हजार ३४१ उद्दिष्टांपैकी गुरुवारपर्यंत (ता.एक) ६८ हजार ३७८ जणांचे लसीकरण झाले आहे. नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे येण्याची गरज व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात गुरुवारपासून आता ४५ ते ५९ वर्ष वयोगटातील व्यक्तींचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु झालेले आहे. यापूर्वी कोरोनायोद्धांसह फ्रंटलाइन वर्कर, ४५ ते ५९ वर्षातील आनुषंगिक आजार असणाऱ्या व्यक्तींसह ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरु झालेले आहे. लसीकरणाचा ता. एक मार्चपासून तिसरा टप्पा सुरू झाला. त्यानंतर पुन्हा यात ४५ वर्ष वयोगटापुढील व्यक्तींचेही लसीकरण सुरु झालेले आहे. जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रुग्णालये, विविध प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच काही खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
त्यामुळे नागरिकांनी लसीकरणाबाबत प्रतिसाद देणे आवश्यक आहे. दरम्यान, गुरुवारी एकूण २ हजार ७३१ जणांचे लसीकरण झाले. यात आरोग्ययोद्ध्यांत ८८ जणांना पहिला व २८ जणांना दुसरा डोस देण्यात आला. फ्रन्टलाइन वर्करमध्ये ५०४ जणांना पहिला व ४९ जणांना दुसरा, ४५ ते ५९ वयोगटातील व्यक्तींमध्ये १ हजार ७७ जणांना पहिला व ७ जणांना दुसरा डोस देण्यात आला. साठ वर्ष वयोगटापुढील ९५४ जणांना पहिला व २४ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
यात एकूण २ हजार ६२३ जणांना पहिला तर १०८ जणांना कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण १९ हजार ६२ आरोग्ययोद्ध्यांचे लसीकरण झाले, यात १३ हजार ३७७ जणांना पहिला तर ५ हजार ६८५ जणांना दुसरा डोस देण्यात आला. १६ हजार ६६४ फ्रंटलाइन वर्करचे लसीकरण झाले, यात १२ हजार ५०६ पहिला तर ४ हजार १८५ जणांना दुसरा डोस देण्यात आला. ४५ ते ५९ वर्ष वयोगटातील ७ हजार ६८४ जणांचे लसीकरण झाले, यात ७ हजार ६७४ जणांना पहिला तर १० जणांना दुसरा डोस देण्यात आला. ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांत २४ हजार ९६८ जणांचे लसीकरण झाले, यात २४ हजार ९३७ जणांना पहिला तर ३१ जणांना दुसरा डोस देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात एकूण ६८ हजार ३७८ जणांचे लसीकरण झाले आहे.
Edited - Ganesh Pitekar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.