esakal | पोलिस नाईक निशीधन शिंदे यांचे कोरोनामुळे निधन, खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार
sakal

बोलून बातमी शोधा

Police Naik Nishidhan Shinde

सुरूवातीला लातूर येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात काही वर्षे नोकरी झाल्यानंतर शिरूर अनंतपाळ येथे बदली झाली होती.

पोलिस नाईक निशीधन शिंदे यांचे कोरोनामुळे निधन, खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार

sakal_logo
By
प्रशांत शेट्टे

चाकूर (जि.लातूर) : येथील पोलिस नाईक निशीधन माणिकराव शिंदे (वय ३६) यांचे कोरोनामुळे गुरूवारी (ता.एक) पहाटे लातूर येथील खासगी रुग्णालयात निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस नाईक निशीधन शिंदे हे शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात कार्यरत होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे लातूर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पोलिस दलात भरती होण्याची त्यांची इच्छा होती. मेहनतीच्या जोरावर २००६ साली त्यांनी पोलीस दलात नोकरी मिळवली.

सुरूवातीला लातूर येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात काही वर्षे नोकरी झाल्यानंतर शिरूर अनंतपाळ येथे बदली झाली होती. कोरोनाचा संकट काळात महत्त्वाची भूमिका बजावित असताना त्यांना फेब्रुवारी महिन्यात कोरोना झाला होता. त्यातून ते बरे झाले होते. त्यानंतर मार्च महिन्यात पुन्हा त्यांना कोरोनाने गाठले. गुरूवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. लातूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई, तीन भाऊ असा परिवार आहे. पोलिस दलासह मित्र परिवारांच्या वतीने त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

loading image
go to top