Coronavirus: जालन्यात प्रतिबंधित क्षेत्र कागदावरच; प्रशासनाचा गलथान कारभार

jalna corona
jalna corona

जालना: मागील पंधरा ते वीस दिवसांपासून जिल्ह्यासह शहरात कोरोना रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाने कोरोना रोखण्यासाठी अंग झटकून काम करणे अपेक्षित असताना प्रशासन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात पूर्णतः अपयशी ठरले आहे. त्यात 1 मार्च रोजी उपविभागीय अधिकारी संदीपान सानप यांनी शहरात दोन ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले होते. त्यातील एक क्षेत्र म्हणजे रेल्वेस्थानक ते नगरपालिकापर्यंतचे सर्व सीमा सीलबंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, हे आदेश कादावरच राहिले आहेत.

जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून कोरोना रूग्णांमध्ये  झपाट्याने वाढ होत आहे. विशेष करून जालना शहरात तर रोज शंभरी पार कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी (कलम 144) जमाव बंदीचे आदेशासह जिल्ह्यातील आठवडी बाजार, दहावी व बारावीचे वर्ग वगळून सर्व शाळा, वसतीगृह, खासगी शिकवण्या ता.31 मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाच्या अमंलबाजवणी करण्यास प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवित चक्क रविवारी (ता.28) जालना नगरपालिकेसमोर बाजार भरला.

तर दुसरीकडे उपविभागीय अधिकारी संदीपान सानप यांनी सोमवारी (ता.एक) जालना शहरातील नगरपालिका परिसरात चार तर काद्राबाद येथे पाच कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याने या दोन्ही ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करून शंभर मीटरपर्यंत सर्व सीमा बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या आदेशाची प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अमंलबजावणीच केली नाही. त्यामुळे मंगळवारी (ता.दोन) रेल्वेस्थानक ते नगरपालिका हा प्रतिबंधित मार्ग सर्वांसाठी खुला होता.

त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्राचे आदेश कागदावर राहिल्याची चर्चा दिवसभर शहरात होती. तर दुसरीकडे प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या आदेशाचे प्रशासनातील अधिकारी अमंलबजावणी करत नाही, असे चित्र ही यानिमित्ताने सर्वांना पाहण्यास मिळाले. त्यामुळे प्रशासनाचा हा गलथान कारभार कोरोना वाढीला हातभरा लावणारा ठरू नये, अशी भिती आता व्यक्त होते आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com