esakal | जालना शहरात अवकाळी पावसाची हजेरी, तापमानाचा पारा खाली

बोलून बातमी शोधा

Rain In Jalna

सुमारे वीस ते पंचवीस मिनिटे पावसाची रिपरिप सुरू होती. त्यानंतर उन्ह-पाऊस असा खेळ पाहण्यास मिळाला. तसेच विजांच्या कडकडाटसह पावसाच्या सरी कोसळल्या.

जालना शहरात अवकाळी पावसाची हजेरी, तापमानाचा पारा खाली
sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : शहरात मंगळवारी (ता.१३) दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. जालना शहरात मंगळवारी ढगाळ वातावरण होते. त्यामुळे तापमानाचा पारा खाली आला होता. मात्र, उकाड्याने मोठी वाढ झाली होती. दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्यास सुरवात झाली. त्यानंतर मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार सरी कोसळण्यास सुरवात.

सकाळी सुरू अन् दुपारी बंद! व्यापारी महासंघ म्हणते, आस्थापना सुरु ठेवा 

सुमारे वीस ते पंचवीस मिनिटे पावसाची रिपरिप सुरू होती. त्यानंतर उन्ह-पाऊस असा खेळ पाहण्यास मिळाला. तसेच विजांच्या कडकडाटसह पावसाच्या सरी कोसळल्या.दरम्यान जिल्ह्यात या पूर्वी ही अवकाळी पावसासह गारपीट झाली होती. त्यामुळे रब्बी पिकांसह फळबाग पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर मंगळवारी पुन्हा मेघगरजेनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. 
दरम्यान या अवेळी आलेल्या पावसामुळे तापमानाचा पारा खाली आला. मात्र, उकड्यात भर पडल्याने जालनेकर हैराण झाले होते.


संपादन - गणेश पिटेकर