
धुळे सोलापूर महामार्गावर महाकाळा जवळ उभे असलेल्या ट्रकला बीड येथून छत्रपती संभाजीनगर कडे जाणाऱ्या कारणे मागून जोराची धडक दिली.
या भीषण अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील एकाच कुटुंबातील चार जण जागी ठार व दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवार दिनांक एक जानेवारी 25 रोजी घडली. हा अपघात एवढा भीषण होता की जेसीबीच्या सहाय्याने कारला बाहेर काढून त्यातील मृतदेह बाहेर काढण्यात आले