Jalna : जालन्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना दाखविले काळे झेंडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalna

Jalna : जालन्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना दाखविले काळे झेंडे

जालना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनाचा ताफ्याला जालन्यात येथील जामवाडी शिवारात शेतकर्‍यांनी रविवारी (ता.चार) काळे झेंडे दाखवत निषेध आंदोलन केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. फडणविस हे समृध्दी महामार्गाची पाहणी करताना जालना तालुक्यातील जामवाडी शिवारात दाखल होताच रविवारी (ता.५) सायंकाळी समृध्दी महामार्गावर शेतकरी व किसान काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी काळे झेंडे दाखवित निषेध केला. कृषी पांपाचा वीज पुरवठा खंडित केला जात असून हे प्रकार थांबवावा.

केंद्र शासनाने अल्पसंख्यांक समाजातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची बंद केलेली शिष्यवृत्ती पूर्ववत सुरू करावी, महापुरूषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदमुक्त करा, शिवाय महापुरूषांबाबत बेताल व्यतव्य करणाऱ्यांवर कारवाई करा, आदी मागण्यांसाठी काळे झेंडे दाखविण्यात आले.

यावेळी अखिल भारतीय किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नारायण वाढेकर, तालुकाध्यक्ष शिवाजी गायकवाड, शेतकरी रतन शिंदे, असंघटित कामगार काँग्रेस जिल्हाध्यक्ष शेख शमशोद्दीन, जिल्हा सचिव गौतम लांडगे आदींनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविले.