
जालना : सध्या ८७ हजार टन खत उपलब्ध
जालना : यंदाच्या खरीप हंगामाची पूर्व तयारी आढावा बैठक कृषीमंत्री दादा भूसे यांनी मागील महिन्यात घेतली होती. त्यानंतर कृषी विभागही जोमाने कामाला लागले आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात दोन लाख ५३ हजार ३०४ टन खताची मागणी करण्यात आली. सध्या ८७ हजार १७ टन खत उपलब्ध झाले आहे. तर आतापर्यंत सुमारे नऊ हजार २१५ टन खताची विक्री ही झाली आहे.
जिल्ह्याचा खरीप पूर्व तयारी आढावा बैठक ता. २२ एप्रिल रोजी कृषीमंत्री दादा भूसे यांनी घेतली होती. या बैठकीत शेतकऱ्यांना खरीप हंगामात बियाणे आणि खतांची टंचाई निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश कृषिमंत्र्यांनी दिले होते. त्यानंतर कृषी विभाग ही जोमाने कामाला लागले आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून जिल्ह्याला दोन लाख ५३ हजार ३०४ टन रासायनिक खताची मागणी केली आहे. यात यात दोन लाख १३ हजार ३५० टन खत हे जिल्ह्यात नव्याने पुरवठा होणार असून मागील खरीप हंगामातील ५८ हजार ३९७ टन खत शिल्लक आहे. यामध्ये ९१ हजार १३६ टन युरिया, ४३ हजार ४१ टन डीएपी, २२ हजार ४७२ टन एसएसपी, २४ हजार ७६९ टन एमओपी, तर ७१ हजार ८८६ टन एनपीके खतांची मागणी यंदाच्या खरीप हंगामात करण्यात आली आहे.
तर आतापर्यंत जिल्ह्यात ८७ हजार १७ टन खत उपलब्ध झाले आहेत. यामध्ये ३८ हजार ५०९ टन युरिया, पाच हजार १३५ टन डीएपी, २६ हजार ४३३ टन एसएसपी, ९०० टन एमओपी तर १६ हजार ४० टन एनपीके खत उपलब्ध झाले आहे. दरम्यान मे अखेरपर्यंत ३३ हजार ९९ टन खत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे यंदा खताची टंचाई भासणार नसल्याचे चित्र आहे.
Web Title: Jalna City Farmer 87000 Tons Of Fertilizer Available
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..