esakal | Jalna: जिल्ह्यात सहा रुग्ण कोरोनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

corona

जालना : जिल्ह्यात सहा रुग्ण कोरोनामुक्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जालना : जिल्ह्यात शुक्रवारी (ता.एक) सहा कोरोना रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. विशेष म्हणजे शुक्रवारी एकाही नवीन रुग्णाची भर पडली नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात सध्या ३५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात शुक्रवारी ९४९ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात एक कोरोना रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ६१ हजार ८०८ कोरोना बाधित मिळून आले आहेत. तर शुक्रवारी सहा कोरोना रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.

परिणामी, आतापर्यंत ६० हजार ५८० रुग्णांनी उपचारानंतर कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आतापर्यंत एक हजार १९३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात सध्या ३५ सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर राज्य राखीव पोलिस बल क्वार्ट सी ब्लॉक येथे एकास संस्थात्मक अलगीकरणात ठेवले आहे. तर २८ जणांना सध्या होम क्वांरटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा: बेळगाव : झोपलेल्या ठिकाणीच रक्ताची उलटी होऊन कामगाराचा मृत्यू

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वांनीच जागरूक असावे. मागील काळात राज्यातील विविध शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती, अनेकांचे बळी कोरोनामुळे गेले होते. राज्यात विविध निर्बंध लागू केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. आता पुढील काळात कोरोनाचा फैलाव होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन व्हावे, मास्कचा वापर करावा, विनाकारण गर्दीत जाणे टाळावे, साबणाने वेळोवेळी हात धुवावेत. महत्त्वाचे म्हणजे पात्र व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे, तसेच लसीकरणाबाबत जनजागृती करावी.

-संभाजी देशमुख, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, घनसावंगी

जालना कोरोना अपडेट

एकूण बाधित :

६१,८०८

आतापर्यंत कोरोनामुक्त :

६०,५८०

एकूण मृत्यू :

१,१९३

आज सक्रिय रुग्ण : ३५

loading image
go to top