विद्यार्थ्यांचा घरबसल्या ऑनलाइन अभ्यास 

बदनापूर :  पेपर सोडविताना विद्यार्थी. तसेच   शिक्षकांनी व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून गृहपाठ देण्यासह केलेले मार्गदर्शन.
बदनापूर : पेपर सोडविताना विद्यार्थी. तसेच   शिक्षकांनी व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून गृहपाठ देण्यासह केलेले मार्गदर्शन.
Updated on

बदनापूर (जि.जालना) -  राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने शाळांना सुटी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळांसह शिक्षकही आपआपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. येथील शिक्षक व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून दररोज गृहपाठ देत देत असून, विद्यार्थ्यांनी केलेला गृहपाठ शिक्षक दररोज तपासत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास होत आहे. 

संपूर्ण जगात दहशत माजविणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय व प्रशासकीय पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शासनाने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अनेक प्रतिबंधात्मक निर्णय घेतले आहेत. त्यात ता,३१ मार्चपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचा देखील समावेश आहे.

शाळांना सुट्या दिल्या याचा उद्देश विद्यार्थ्यांनी घरातच राहून आपला अभ्यास करावा असा आहे. मात्र विद्यार्थी स्वतः होऊन अभ्यास करतील याची शाश्वती नाही. त्यांना सुट्या म्हणजे खेळ खेळणे एव्ढेच समीकरण कळते. त्यामुळे बदनापूर येथील संस्थाचालक भरत भांदरगे यांनी वेगळीच शक्कल लावून आर. पी. इंग्लिश मीडिअम, आर. पी. इंटरनॅशनल स्कूल व परमपूज्य ज्ञानानंद सरस्वती सेमी इंग्लिश स्कूल अशा तिन्ही शाळेतील विद्यार्थांना अभ्यास गुंतवून ठेवले आहे.

शाळेत त्यांनी यापूर्वीच प्रत्येक वर्गातील शिक्षक व विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले आहे. त्याचा खुबीने वापर करून प्रत्येक वर्गातील विद्यार्थांना सुटीत देखील गृहपाठ देण्याचा प्रयोग केला आहे. यानुसार शाळेतील शिक्षक दररोज सकाळी ११ वाजता विविध विषयांचे गृहपाठ आणि चाचणी पेपर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पाठवतात. यानंतर विद्यार्थी दिलेला गृहपाठ सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत सोडवून आपल्या वर्गातील ग्रुपवर टाकतात. त्यानंतर शिक्षक त्यास तपासतात, अशा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा सुट्या मधील अभ्यासही बुडत नाही. त्यांचा नियमित अभ्यास होतो. आणि महत्वाचे म्हणजे गृहपाठ करणे बंधनकारक असल्यामुळे त्यांना बाहेर फिरता येत नाही, त्यामुळे विषाणूंचा संसर्ग टाळता येतो. 

पालकांकडून पाल्यांची जागृती गरजेची 

कोरोनाच्या संकटामुळे शाळेला सुट्या देण्यात आलेल्या असताना अनेक शालेय विद्यार्थी उन्हाळी सुट्ट्या लागल्याप्रमाणे बाहेर फिरत आहेत, खेळत आहेत. अशा विद्यार्थ्यांना बाहेर फिरण्यास पालकांनी मज्जाव करून त्यांना कोरोना विषाणूंचा धोका समजून सांगण्याची आवश्‍यकता आहे.पालकांकडून पाल्यांची जागृती गरजेची आहे. 

विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी शासनाने सुट्या जाहीर करून चांगला निर्णय घेतला आहे. या काळात विद्यार्थांनी घराबाहेर पडू नये असे अपेक्षित आहे. त्यामुळे आमच्या शाळेतील विद्यार्थांना व्हॉटसॲप ग्रुपच्या माध्यमातून दररोज अभ्यास दिला जात आहे. त्यामुळे विद्यार्थी घराबाहेर पडत नसून घरी अभ्यास करीत आहेत. 
- भरत भांदरगे 
संस्थापक : आर. पी. इंग्लिश मीडिअम स्कूल 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com