esakal | जालन्यात कोरोना नियंत्रणात पण प्रलंबित चाचण्यांचा प्रश्न कायम
sakal

बोलून बातमी शोधा

jalna corona

जालन्यात कोरोना नियंत्रणात पण प्रलंबित चाचण्यांचा प्रश्न कायम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जालना: Jalna corona cases: जिल्ह्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्याचे चित्र आहे. मात्र, प्रलंबित कोरोना चाचण्यांचा प्रश्न कायम असल्याचे चित्र आहे. बुधवारी (ता.२८) जिल्ह्यात एक हजार ७४६ जणांच्या कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र, कोरोना चाचणीचे तब्बल तीन हजार ३५ नमुने प्रलंबित राहिले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात नव्याने पाच कोरोना रुग्णांची भर पडली असून दोन रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात कोरोना संसर्ग आटोक्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून हजारो जणांच्या कोरोना चाचण्या केल्यानंतर प्रतिदिन दहाच्या आत नवीन रुग्ण आढळून येत आहेत. ही बाब जिल्ह्यासाठी सकारात्मक आहे. मात्र, कोरोना चाचणीसाठी घेतलेले नमुने प्रलंबित राहण्याच्या संख्येतही भर पडत आहे. बुधवारी एक हजार ७४६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र, दुसरीकडे तब्बल तीन हजार ३५ कोरोना चाचणी नमुने प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे पुन्हा कोरोना संसर्ग प्रसाराची भिती निर्माण होत असून प्रलंबित चाचण्यांकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. दरम्यान, बुधवारी जिल्ह्यात पाच नवीन कोरोना रुग्णांची भर पडली.

हेही वाचा: मावेजासाठी नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर काम बंद आंदोलन

यामध्ये जालना शहर, तालुक्यातील हतवन, घनसावंगी तालुक्यातील शेवता, अंबड शहर, भोकरदन शहर येथील प्रत्येकी एकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आतापर्यंत ६१ हजार ४१० कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर दोन कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे झाल्याने आतापर्यंत ६० हजार १७४ रुग्ण उपचारानंतर कोरोनावर विजय प्राप्त केला आहे. दरम्यान, आतापर्यंत कोरोनामुळे एक हजार १७९ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ५७ सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा: IMF On Indian Economy: भारताच्या आर्थिक विकास दरात आणखी घट

जिल्ह्यातील कोरोना रुग्ण स्थिती

एकूण कोरोनाबाधित : ६१ हजार ४१०
एकूण कोरोनामुक्त : ६० हजार १७४
एकूण मृत्यू : १ हजार १७९
उपचार सुरू : ५७

loading image
go to top