esakal | Jalna: वाटमारी करणाऱ्या टोळीला पकडले
sakal

बोलून बातमी शोधा

टोळीला पकडले

जालना : वाटमारी करणाऱ्या टोळीला पकडले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गोंदी : देवदर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांचा रस्ता आडवून वाटमारी करणाऱ्यांना गोंदी पोलिसांनी बुधवारी (ता.१३) रात्री पाठलाग करून कुरण फाटा येथे पकडले. या प्रकरणी चौघांवर गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यात प्रकरणी दोन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

घनसावंगी तालुक्यातील उढाण कंडारी येथील सिद्धेश्वर प्रल्हाद जोगदंड खासगी प्रवासी जीप भाड्याने चालवतात. दरम्यान, बुधवारी सकाळी ते रामसगाव येथील भाडे घेऊन तुळजापूर येथे देवदर्शनाला गेले होते. देवदर्शन आटोपून परतीच्या प्रवासात असताना त्यांची जीप रात्री नऊच्या दरम्यान गोंदी-शहागड मार्गावरील कुरण फाटा येथे आली. तेथे आधीच दबा धरून बसलेल्या चौघांनी जोगदंड यांची जीप आडवली. हातात लाठ्याकाठ्या घेऊन रस्त्यात आडवे झालेले तरुण पाहून जोगदंड यांनी जीपच्या सर्व काचा बंद केल्या. त्यानंतर गोंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ जमादार कल्याण आटोळे यांना मोबाइलवरून संपर्क केला.

हेही वाचा: आव्हाडांऐवजी दुसऱ्या कुणाला त्वरित जामीन मिळाला असता का? - राम कदम

तेव्हा शहागड येथील औरंगाबाद धुळे महामार्गावर श्री.आटोळे होते. त्यांनी प्रसंगावधान राखत सहकाऱ्यांसह घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिस आल्याचे पाहून चोरट्यांनी दोन दुचाकीवरून गोंदीकडे पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून वाटमारी करण्याच्या तयारीत असलेल्या चौघांनाही गोंदी शिवारात दुचाकीसह ताब्यात घेतले. संशयितांकडून आणखीही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे. दरम्यान, सिद्धेश्वर जोगदंड यांच्या फिर्यादीवरून गोंदी पोलिस ठाण्यात रवी दत्तात्रय मरकड, किरण शेषराव शिंदे, अजय गणेश दाभाडे (तिघेही रा. गोंदी ) व किशोर अर्जुन पिंगळे (रा. घुंगर्डे हादगाव) या चौघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ करीत आहेत.

loading image
go to top