Jalna crime news : पतीने चिरला पत्नीचा गळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murder

Jalna crime news : पतीने चिरला पत्नीचा गळा

जालना : कौटुंबिक वादातून पतीने माहेरी आलेल्या पत्नीचा गळा चिरून खून केल्याची घटना गुरूवारी (ता.दहा) सायंकाळी तालुक्यातील कुंबेफळ येथे घडली आहे. रमा संदीप कदम (वय २५) असे मयत विवाहितेचे नाव आहे. दरम्यान पती खून केल्यानंतर फरारी झाल्याचे तालुका जालना पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

कौटुंबिक वादामुळे नूतनवाडी (ता. बदनापूर) येथील विवाहित रमा संदीप कदम (वय २५) ही माहेरी राहत होती. दरम्यान, गुरूवारी दुपारी पती संशयित संदीप कदम हा रमा कदम हिच्या माहेरी कुंबेफळ येथे आला. जावई घरी आल्यानंतर घरातील इतर सदस्य आपल्या कामाला निघून गेले.

याच दरम्यान पती संदीप कदम याने धारदार शस्त्राने रमा कदम हिचा गळा चिरून खून केला. खून केल्यानंतर संदीप कदम हा फरारी झाला आहे. याबाबत माहिती मिळताच तालुका जालना पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रूग्णालय येथे दाखल केला आहे. फरारी संदीप कदम याचा तालुका जालना पोलिस शोध घेत आहेत.