
या दोन्ही संशयितांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
जालना : शहरातील बसस्थानक परिसरातील संग्रामनगर येथील अतिक्रमणातील जागा हडपण्याची दमदाटी करत हप्त्याला एक हजारांची खंडणी मागणाऱ्या दोन संशयित आरोपींना सदर बाजार पोलिसांनी सोमवारी (ता.पाच) अटक केले आहे. बसस्थानक जवळील संग्रामनगर येथे अतिक्रमणातील जागा हडपण्यासाठी दमदाटी करून जागा पाहिजे असल्यास हप्त्याला एक हजारांची दोन जणांनी खंडणी मागितल्याची तक्रार एका महिलेने ता. दोन फेब्रुवारी रोजी सदर बाजार पोलिस ठाण्यात दिली होती.
कोरोनाचा वाढता आलेख, बीड जिल्ह्यात मृत करोना रुग्णांवर सामुहिक अंत्यसंस्कार
त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित आरोपी शेख मुक्ताक शेख शफीक (वय ३१, रा. वलीमामू दर्गा जवळ, जालना) याला पोलिसांनी बसस्थानक परिसरातून सपाळला रचून अटक केली. तर इम्राखान बशीरखान पठाण (वय ३०, रा. लोहार मोहल्ला, जालना) लोहार मोहल्ला येथून बाजार पोलिसांनी अटक केली. या दोन्ही संशयितांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलिस निरीक्षक संजय देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक मंजुषा सानप, कर्मचारी अंमलदार कैलास खार्डे, समाधान तेलंग्रे, फुलचंद गव्हाणे, राजू वाघमारे, वैभव खोकले यांनी केली.
Edited - Ganesh Pitekar