Jalna-अंबड रस्त्यावर बँक कर्मचाऱ्यांना मारहाण, १५ लाख घेऊन चोर पसार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news
Jalna अंबड रस्त्यावर बँक कर्मचाऱ्यांना मारहाण, १५ लाख घेऊन चोर पसार

Jalna-अंबड रस्त्यावर बँक कर्मचाऱ्यांना मारहाण, १५ लाख घेऊन चोर पसार

sakal_logo
By
बाबासाहेब गोंटे

अंबड (जि.जालना) : अंबड-जालना महामार्गावरील गोलापांगरीजवळ दुचाकी अडवून बँक कर्मचाऱ्यांना मारहाण करत १५ लाख रुपयांचे रोकड घेऊन चोरटा पसार झाला आहे. याबाबत माहिती अशी की, गोलापांगरी(ता.जालना) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Jalna District Cooperative Bank) शाखेत जालना येथून शुक्रवारी (ता.२६) बँकेचे व्यवस्थापक एस.यू.गोडबोले व शिपाई ए.आर.सुतार हे दोघे कर्मचारी दुचाकीवरून पंधरा लाख रुपयांचे रोकड घेऊन जालना येथून गोलापांगरीकडे येत होते. गावालगतच पाठीमागून दुचाकीवर आलेल्या अज्ञात चोरट्याने शेतालगत (Ambad) असलेल्या एका इंग्रजी शाळेजवळ बँक कर्मचाऱ्यांची दुचाकी अडवली. चाकूचा धाक दाखवत दोघांना मारहाण करुन १५ लाख रूपये घेऊन चोरटा पसार झाला. (Crime In Jalna)

हेही वाचा: डाॅक्टरांच्या हालगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू, नातेवाईकांचा आक्रोश

या घटनेची माहिती मिळताच जालना तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती खेडकर व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. जालना येथूनच चोरट्याने बँक कर्मचाऱ्यांचा पाठलाग करत गोलापांगरीलगत पैशावर डल्ला मारला आहे. मोठी रक्कम घेऊन जात असताना कोणत्याही प्रकारचे संरक्षण त्या कर्मचाऱ्यांना नव्हते.

loading image
go to top