

Police recovered the mobile phone of Daulat Ramnath Satpute Maharaj from a well near the temple in Avghadraw Sawangi, Bhokardan, Jalna district. The device has been sent for cyber forensic examination
esakal
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथील ह.भ.प. दौलत रामनाथ सातपुते महाराज यांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. महाराजांचा मृतदेह आढळल्यानंतर घटनास्थळी त्यांचा मोबाईल सापडला नव्हता. त्यामुळे पोलिसांकडून मोबाईलचा शोध घेतला जात होता. अखेर मंदिर परिसरातील विहिरीत महाराजांचा मोबाईल आढळून आला असून, पोलिसांनी तो ताब्यात घेतला आहे. या मोबाईलमधील डिजिटल माहितीच्या आधारे मृत्यू प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.