

Jalna Crime
sakal
जालना : जालना शहरासह जिल्ह्यात छोट्या-मोठ्या गुन्हेगारांकडे गावठी पिस्तुले आढळत आहेत. ते मध्य प्रदेशातून जळगावमार्गे शहरात येत आहेत. मागील अकरा महिन्यांत पोलिसांनी तब्बल ३० गावठी पिस्तुलांसह ५७ जिवंत काडतुसे, तीन मॅगेझिन जप्त केली आहेत. यातील ८० ते ९० टक्के गावठी पिस्तुले मध्य प्रदेश बनावटीची असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.