जालना : वाटमारी करणारे चार संशयित पकडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalna Four suspect accuse arrested

जालना : वाटमारी करणारे चार संशयित पकडले

जालना : तालुक्यातील राममूर्ती शिवारात सराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या चार संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे. या चौघांकडून एक लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान या प्रकरणातील एक संशयित फरार असून त्यांच्याकडे मुद्देमाल असल्याची माहिती पोलिसांना या संशयितांनी दिली आहे.

शहरातील सराफा व्यापारी अभिजित दुसाने हे शुक्रवारी रात्री रामनगर येथील सराफाची दुकान बंद करून जालन्याकडे येत होते. जालना-मंठा रोडवरील राममूर्ती शिवारात आल्यानंतर एका दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी सराफा व्यापारी अभिजित दुसाने यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. तसेच गावठी पिस्तुलाचा धाक दाखवत या चोरट्यांनी सराफा व्यापारी दुसाने यांच्याकडील असलेली बॅग हिसकावली, चार लाख ४१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन दुचाकीवर पसार झाले. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेला संशयितांची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील आझाद मैदान येथून मंगळवारी (ता.तीन) रात्री सापळा रचून अभिजित दुर्योधन राठोड (रा. सोमनाथ जळगाव तांडा, ता.जि. जालना), अभिजित राजेश पवार (रा. रामनगर,ता.जि. जालना), पवन भास्कर कायंदे (रा. गणपती गल्ली, जालना), सुदाम प्रकाश राठोड (रा. सोमनाथ तांडा, ता.जि. जालना) या चार संशयितांना पकडले. त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमालांपैकी एक सोन्याची नथ, चार सोन्याचे सेवनपीस, चांदीचे कडे, दोन सोन्यांचे टॉप्स असे सोने-चांदीचे दागिने, दहा हजार ३०० रुपये रोख, एक दुचाकी, मोबाईलफोन असा एकूण एक लाख ७० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.

ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, अंमलदार सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, भाऊसाहेब गायकेड, फुलचंद हजारे, संजय मगरे, कृष्णा तंगे, जगदीश बावणे, रूस्तूम जैवाळ, विनोद गडदे, सचिन चौधरी, सुधीर वाघमारे, प्रशांत लोखंडे, फुलचंद गव्हाणे, रंजित वैराळ, देविदास भोजणे, किशोर पुंगळे, परमेश्‍वर धुमाळ, भागवत खरात, सचिन राऊत, कैलास चेके, योगेश सहाने, रवी जाधव, संजय राऊत, सुरज साठे, महिला पोलिस कर्मचारी शडमल्लु यांनी केली.

Web Title: Jalna Four Suspect Accuse Arrested Police Action One Lakh 70 Thousand Rupees Confiscated

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top