esakal | Jalna : रेड्यांची झुंज लावणे महागात
sakal

बोलून बातमी शोधा

jalna

Jalna : रेड्यांची झुंज लावणे महागात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जालना : प्राण्यांच्या झुंजीवर बंदी असता जालना तालुक्यातील पिरकल्याण येथील गायरान जमिनीवर पैशांवर रेड्यांची झुंज लावणाऱ्या चार जणांसह त्यांच्या साथीदारांवर जालना पोलिसांनी रविवारी (ता.१२) गुन्हा दाखल केला आहे. तसेच साडेसोळा लाखांचा मुद्देमाल ही जप्त केला आहे.

मनोरंजनासह पैशांसाठी प्राण्यांच्या झुंज लावण्याला शासनाने बंदी घातली आहे. मात्र, ग्रामीण भागात आजही लपून छपून पैशांवर प्राण्यांची झुंज लावली जाते. जालना तालुक्यातील पिरकल्याण येथील गायरान जमीनवर काही इसमांनी रविवारी (ता.१२) दुपारी रेड्याची झुंज लावली. याची माहिती तालुका जालना पोलिसांना मिळाली. त्यानुसार जालना पोलिसांचे एक पथक पिरकल्याण येथे झुंज लावलेल्या ठिकाणी दाखल झाले. पोलिसांना पाहिल्यानंतर येथील जमावाने पळ काढला.

मात्र, पोलिसांनी पाठलाग करून काही लोकांकडे चौकशी केली असता या चौकशी दरम्यान शेख चिंग्या शेख गफार (रा.जामवाडी, ता.जालना), चांदभाई (रा.देवमूर्ती,ता.जालना), सय्यद मुजीब रफिक (रा.देवमूर्ती), किशोर कदम (रा.धारकल्याण, ता.जालना) या रेड्यांच्या मालकांनी साथीदारांसह रेड्यांची पैशांवर झुंज लावून जुगार खेळला. तसेच गर्दी करून कोरोना साथ रोग नियमाचे उल्लंघन केल्याचे पुढे आले. या प्रकरणी तालुका जालना पोलिस ठाण्यात या चार जणांसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सहा टेम्पो, दोन कार असा साडेसोळा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारोती खेडकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. कासुळे, पोलिस अंमलदार वसंत धस, कृष्णा भंडागे, नितीन झोटे, चरणसिंग सिंगल, अरुण मुंढे, विठ्ठल कापसे, बाळू ढाकणे यांनी केली.

loading image
go to top