esakal | राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! निर्णयाचा परिणाम राज्यातील 33 जिल्ह्यांतील पालिकांवर

बोलून बातमी शोधा

voter id}

हरकती व आक्षेप निकाली निघून वस्तुनिष्ठ मतदार यादी तयार होण्यास मदत होणार आहे

marathwada
राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! निर्णयाचा परिणाम राज्यातील 33 जिल्ह्यांतील पालिकांवर
sakal_logo
By
सुभाष बिडे

घनसावंगी(जालना): राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचं प्रारूप मतदार यादीवर आक्षेप व हरकतींचा पाऊस पडलेला आहे. त्यामुळे या बाबी निकाली काढण्यासाठी लागणारा कालावधी पाहता राज्य निवडणूक आयोगाने या मतदार यादीचा कार्यक्रमाला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे हरकती व आक्षेप निकाली निघून वस्तुनिष्ठ मतदार यादी तयार होण्यास मदत होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या ता.२ फेब्रुवारी २०२१ च्या पत्रान्वये राज्यातील मुंबई शहर व मुंबई उपनगर तसेच पालघर व सातारा जिल्हा वगळून सर्व जिल्ह्यांतील पालिकांचा समावेश आहे. एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या तसेच फेब्रुवारी २०२१ मध्ये मुदत समाप्त होणाऱ्या नगरपरिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता हद्दवाढ क्षेत्रांच्या व अन्य नगरपरिषदा व नगरपंचायतीमधील रिक्त सदस्य पदांच्या पोटनिवडणुकीकरिता मतदारयादी तयार करण्याचा कार्यक्रम दिला आहे.

Coronavirus: धक्कादायक! आश्रमातील तब्बल 29 जणांना कोरोनाची लागण

काही नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये प्रारूप मतदार यादीवर मोठ्या प्रमाणावर आक्षेप हरकती प्राप्त झाल्या आहेत. सध्या राज्यामध्ये कोरोनाच्या रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने या हरकती व सूचनांवर आवश्‍यक तेथे क्षेत्र भेटीद्वारे वस्तुनिष्ठ निर्णय घेण्याकरिता अधिक कालावधी लागण्याची शक्‍यता आहे. काही नगरपरिषदा व नगरपंचायतीने आयोगास यासंदर्भात कळविले आहे. त्यांच्याकडून प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी अधिप्रमाणीत करून प्रसिद्ध करण्याची तारीख वाढवून देण्याची विनंती करण्यात आली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने ता.दोन फेब्रुवारी २०२१ रोजी निर्गमित केलेल्या मतदार यादीच्या कार्यक्रमात बदल केला आहे.

हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगामात यावर्षी विक्रमी कर्ज वाटप

मतदार यादीचा अंशतः सुधारित करून अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिक प्रमाणित करून प्रसिद्ध करण्यासाठीची तारीख पूर्वीच्या ता.१ मार्च २०२१ ऐवजी १५ मार्च २०२१ अशी केली आहे. मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करणे आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची मुदत ता.८ मार्च २०२१ ऐवजी ता.३१ मार्च २०२१ अशी असेल, असे राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव संजय सावंत यांनी कळविले आहे