जालना : एसटीला पंढरीची वारी लाभदायी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MSRTC bus for padharpur

जालना : एसटीला पंढरीची वारी लाभदायी

जालना - दोन वर्षांपासून कोरोनामुळे पंढरीची वारी बंद होती. त्यामुळे वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊ शकले नाही. मात्र, यंदा कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याने पंढरीची वारीला लाखो भाविक गेले होते. या पंढरीच्या वारीसाठी जालना जिल्ह्यातून १२५ विशेष बस सोडण्यात आल्या होत्या. या बससेवेमुळे पंढरीचा विठ्ठल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला पावला असून तब्बल ८० लाखांचे उत्पन्न झाले आहे.

कोरोनाचे दोन वर्ष सामान्य लालपरी आगारात बंद होती. त्यानंतर एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी संपावर गेल्याने अनेक महिने कोरोना आटोक्यात आल्यानंतर बससेवा बंद होती. त्यामुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते.

या आर्थिक संकटातून सावरत सामान्यांची लालपरी मागील काही महिन्यांपासून पुन्हा रस्त्यावर धावत आहे. त्यात यंदा कोरोना संसर्ग आटोक्यात आल्यानंतर दोन वर्षांनंतर आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते. त्यामुळे जालना जिल्ह्यातील चार आगारातून पंढरपूरसाठी ता.सहा जुलैपासून १२५ विशेष बस सोडण्यात आल्या होत्या. यामध्ये जालना व अंबड आगारातून प्रत्येकी ४०, परतूर आगारातून २० व जाफराबाद आगारातून २५ विशेष बस पंढरपूरसाठी सोडण्यात आल्या होत्या. या १२५ बसने ५१२ फेऱ्या केल्या. या फेऱ्यांतून एसटी महामंडळाला तब्बल ८० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये सर्वाधिक २६ लाख उत्पन्न हे अंबड आगाराचे आहे. त्यापाठोपाठ जालना आगाराला २५ लाख, जाफराबाद आगाराला १५ लाख तर परतूर आगाराला १४ लाखांचे उत्पन्न झाले आहे. त्यामुळे दोन वर्षांच्या मोठ्या कालखंडानंतर पंढरीच्या वारीतून एसटीला विठ्ठल पावला आहे.

आगार - बस संख्या - उत्पन्न

जालना - ४० - २५ लाख

अंबड - ४० - २६ लाख

परतूर - २० - १४ लाख

जाफराबाद - २५ - १५ लाख

जिल्ह्यातील चार आगारातून १२५ बस गाड्या आषाढी एकादशी यात्रेसाठी पंढरपूरसाठी सोडण्यात आल्या होत्या. या बसगाड्यांनी ५२१ फेऱ्या केल्या असून त्यातून ८० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

- प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक, जालना.

Web Title: Jalna Msrtc Pandharpur St Bus Service Income Ashadhi Wari

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..