esakal | भाजप नेत्याचा भाचा 2 वर्षांसाठी तडीपार; मामा-भाच्यामधील वाद विकोपाला
sakal

बोलून बातमी शोधा

mla narayan kuche

राज्यात भाजपा विरुद्ध सत्ताधारी महाविकास आघाडी संघर्ष सुरुच आहे. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आगपाखड सुरु आहे

भाजप नेत्याचा भाचा 2 वर्षांसाठी तडीपार; मामा-भाच्यामधील वाद विकोपाला

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

जालना: राज्यात भाजपा विरुद्ध सत्ताधारी महाविकास आघाडी संघर्ष सुरुच आहे. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आगपाखड सुरु आहे. अशातच जालना जिल्ह्यातील भाजप नेत्याच्या घरातील वाद विकोपाला गेला आहे. भाजपाचे बदनापुरचे आमदार नारायण कुचे यांचा भाचा दीपक डोंगरे याच्यावर जालना पोलिसांनी विविध गुन्ह्याअंतर्गत मोठी कारवाई केली आहे.

विविध गुन्ह्यात आरोपी असलेल्या दीपक डोंगरेला 2 वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. ही कारवाई मामा अर्थात आमदार नारायण कुचे यांनी केली असल्याचा आरोप भाचा डोंगरेने केला आहे. ही कारवाई आमदार कुचे यांनी सूडबुद्धीने केली असल्याचा आरोप भाचा दीपक डोंगरे याने केला आहे.

नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी, बीड जिल्ह्यातील प्रभारींच्या निवडी घोषित

तसेच दीपक डोंगरे याने समाज माध्यमाच्या साहाय्याने मामा नारायण कुचे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आमदारपदाचा गैरवापर करत ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तडीपार केल्याचा गंभीर आरोप दीपक डोंगरे याने केला आहे. इथं न थांबता आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्नही केला असल्याचा आरोप डोंगरे याने केला आहे. 

तसेच आपल्या जिवाचे काही बरे-वाईट झाले तर यास मामा अर्थात आमदार कुटे सर्वस्वी जबाबदार राहतील, असं दीपक डोंगरेने म्हटलं आहे. मला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे की मला तिथं न्याय मिळेल.

(edited by- pramod sarawale)
 

loading image
go to top