esakal | नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी, बीड जिल्ह्यातील प्रभारींच्या निवडी घोषित
sakal

बोलून बातमी शोधा

41Mum_BJP_beats_Sena_BMC_byel_10

आगामी वर्षाच्या पहिल्याच महिन्यात जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.

नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी, बीड जिल्ह्यातील प्रभारींच्या निवडी घोषित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड : आगामी वर्षाच्या पहिल्याच महिन्यात जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या पाचही नगरपंचायतीवर कमळ फुलविण्यासाठी भाजपचे मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यासाठी निवडणूक प्रभारीच्या निवडी जाहीर करण्यात आल्या असून आमदार लक्ष्मण पवार, डॉ. स्वरुपसिंह हजारी, सर्जेराव तांदळे, राजाभाऊ मुंडे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली.

नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात जिल्ह्यातील वडवणी, आष्टी, पाटोदा, शिरूर, केज येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. राज्यात तीन पक्षाचे सरकार असल्याने वरील नगरपंचायती ताब्यात घेण्यासाठी जिल्ह्यातील भाजपने रणनीती आखायला सुरुवात केली आहे. यासाठी प्रत्येक नगरपंचायतीसाठी अनुभवी प्रभारीची निवड करण्यात आली आहे. हे प्रभारी निवडणुकीसाठी योग्य उमेदवारांची चाचपणी करून त्यांची नावे वरिष्ठांकडे पाठवणार आहेत.कुठे कोणाची निवड
------
वडवणी नगरपंचायत – आमदार लक्ष्मण पवार.
केज नगरपंचायत – राजेंद्र मस्के.
पाटोदा नगरपंचायत – डॉ. स्वरुपसिंह हजारी.
आष्टी नगरपंचायत - अॅड. सर्जेराव तांदळे.
शिरूर नगरपंचायत - राजाभाऊ मुंडे

Edited - Ganesh Pitekar

loading image
go to top