Selu News : डिग्रस पाटी- सेलू रस्त्याचे काम दहा महिन्यांपासून संपता संपेना; वाहनधारक त्रस्त

देवगाव (फाटा) ते पाथरी महामार्गावरील डिग्रस पाटी ते पाथरी रेल्वे गेट हे साडेपाच किलोमीटरचे काम कासव गतीने सुरू आहे.
Highway Work
Highway Worksakal

सेलू - जालना राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अखत्यारीत असलेला देवगाव (फाटा) ते पाथरी महामार्गावरील डिग्रस पाटी ते पाथरी रेल्वे गेट हे साडेपाच किलोमीटरचे काम कासव गतीने सुरू आहे. कामाचा निकृष्ट दर्जा व रखडत चाललेल्या कामामुळे नागरिकात तीव्र नाराजी आहे.

सेलूतील साडेपाच किलोमीटरसह पाथरी ते गव्हाण पाटी साडेबारा किलोमीटरचे ५४८ (ब) महामार्गाचे काम एक कंपनी करीत आहे. संपूर्ण साडेबारा किलोमीटर कामावर शंभर कोटी रुपये खर्च आहे. डिग्रस बरसाले पाटी ते सेलूतील रायगड कॉर्नरपर्यंत रस्त्याचे खोदकाम सुरू केल्यानंतर रखडले.

पुन्हा चार- पाच महिने ब्रेकनंतर सुरू झाले. सिमेंट काँक्रिटीकरण आजही काम अपूर्ण आहे. जिंतूर नाका थातूरमातूर सिमेंट भरण्यात ते पाथरी रेल्वे गेट पर्यंतचे कामही अपूर्ण आल्याच्या तक्रारी झाल्या आहेत.

खोदकामानंतर डिग्रस- सेलू दोन्ही बाजूच्या सिमेंट कॉंक्रीट रस्त्याच्या माती कामांमध्ये नाल्याचे काम निकृष्ट दर्जाचे मुरुमा ऐवजी सर्रास काळी माती झाल्याची ओरड होत आहे. एका बाजूला उंची, रस्ते कामाचा दर्जा आणि अर्धवट रस्ता कामामुळे वाहनधारकांची तारांबळ उडत आहे. नियोजन शून्य कामाची पद्धत यावरून जागरूक नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. बोगस काम होत असल्याने कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

याकडे राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता अधिकारी सर्रास दुर्लक्ष करीत आहेत. तर ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करीत आहे. असा आरोप होत आहे. मात्र, याकडे संबंधित विभागासह कंत्राटदाराचेही दुर्लक्ष होत असल्याने व त्यातच

वर्षभरापासून रखडत सुरू असलेल्या कामामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. छोटे- मोठे अपघात घडत आहेत.

नाल्याच्या बाजूच्या जागेवर अतिक्रमणे आहेत. काही मंडळी कामात अडथळा करीत आहेत. मजुरांना मारहाणीचे प्रकार घडलेत. कामाचा कालावधी डिसेंबर २०२२ ते जून २०२४ असा आहे. काम वेळेत व दर्जेदार पद्धतीने व्हावे. याकडे लक्ष आहे. असे महामार्ग उपविभागीय अभियंता अभिजित घोडेकर यांनी सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com