Jalna News : शेततळ्यामध्ये बुडून तीन मुलांसह चौघांचा मृत्यू; सख्खे भाऊ, पिता-पुत्राचा समावेश

drowned-fil-pic
drowned-fil-pic

जालना : शेततळ्यात बुडून तीन मुलांसह चौघांचा मृत्यू झाल्याची घटना सामनगाव (ता. जालना) येथे मंगळवारी (ता. ६) घडली. मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ, पिता-पुत्राचा समावेश आहे.

drowned-fil-pic
Mumbai : किलबिलाट अ‍ॅम्ब्युलन्स उपक्रम लवकरच राज्यभर सुरु होणार

ओंकार कृष्णा पडूळ (वय ७) ), भागवत कृष्णा पडूळ (९), युवराज भागवत इंगळे (७) हे दुपारी खेळत असताना सामनगावातील शेततळ्‍यात पोहण्यासाठी उतरले. अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडू लागले. आरडाओरड सुरू होताच शेततळ्याशेजारी असलेले भागवत जगन्नाथ इंगळे ( ३६) हे तिघांना वाचविण्यासाठी शेततळ्यात उतरले.

मात्र तीन मुलांसह त्याचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेले ओंकार व भागवत पडूळ हे सख्खे भाऊ तर भागवत जगन्नाथ इंगळे व युवराज भागवत इंगळे हे पिता-पुत्र आहेत.

drowned-fil-pic
Jitendra Awhad: मन सुन्न झालंय...! राज्यात आणखी एक दलित हत्याकांड; आव्हाडांच्या ट्विटनं वेधलं लक्ष

घटनेची माहिती गावात कळताच ग्रामस्थांनी शेततळ्याकडे धाव घेतली. जालना तालुका पोलिसांना ग्रामस्थांच्या मदतीने चौघांचे मृतदेह शेततळ्याबाहेर काढले व पंचनामा केला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com