जालन्यात २९७ किलो गांजा नष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police

जालन्यात २९७ किलो गांजा नष्ट

जालना : जिल्ह्यात नऊ पोलिस ठाण्यांनी विविध पंधरा गुन्ह्यात जप्त केलेला २९७ किलो ९६१ ग्रॅम गांजा बुधवारी पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पोलिस मुख्यालय परिसरात नष्ट करण्यात आला आहे. जिल्ह्यातील कदीम जालना, चंदनझिरा, बदनापूर, तालुका जालना, मंठा, भोकरदन, टेंभुर्णी, पारध, घनसावंगी या नऊ पोलिस ठाण्यांनी विविध पंधरा छाप्यांमध्ये २९७ किलो ९१६ ग्रॅम गांजा जप्त केला होता. या जप्त केलेला मुद्देमाल पोलिस संरक्षणामध्ये पोलिस मुख्यालय येथील अंमली पदार्थ गोदाम येथे ठेवण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी जप्त केलेला २९७ किलो ९१६ ग्रॅम गांजा नष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार बुधवारी पोलिस मुख्यालयाच्या परिसरात दोन पंचासमक्ष हा २९७ किलो ९१६ ग्रॅम गांजा नष्ट करण्यात आला आहे.

यावेळी पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, प्रभारी पोलिस उपअधीक्षक संजय व्यास, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळाचे सहायक रासायनिक विश्लेषक संतोष कोते, उपप्रादेशिक अधिकारी सोमनाथ कुरमुडे, प्रदूषण नियंत्रण मंडळ डॉ. योगिनी बाळंके, वजनमापेचे रमेश राठोड, नगरपालिका अग्निशामक दलाचे जवान, पोलिस अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Web Title: Jalna Nine Police Station Seized 297 Kg Cannabis Destroyed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalnapolicecrimeSakal
go to top