

Jalna Crime
sakal
जालना : शहरातील नूतन वसाहत येथे जुन्या वादातून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने शुक्रवारी (ता.२५) रात्री जबर मारहाण केली. या मारहाणीत विकास प्रकाश लोंढे (वय २४, रा. नूतन वसाहत) याचा उपचारादरम्यान शनिवारी (ता.२४) पहाटे छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयितासह चार जणांना ताब्यात घेतले आहे.