जालना : पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची लूट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalna Partur farmers crop insurance

जालना : पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची लूट

परतूर : शेतकऱ्यांचा पीक विमा हा मागील काही वर्षांपासून आपले सरकार सेवा केंद्रावर ऑनलाइन भरला जात आहे. परंतु, अनेक आपले सरकार केंद्रावर शेतकऱ्यांची लूट होताना दिसत आहे. एका अर्जाचे शंभर ते दोनशे रुपये घेतले जात आहेत. आपले सरकार सेवा केंद्र चालकाला शासनाकडून अर्जाला ठरावीक पैसे दिले जात आहेत, मात्र तरी देखील अनेक केंद्रचालक शेतकऱ्यांकडून एका अर्जाचे शंभर ते दोनशे रुपये घेतले जात आहेत.

अनेकांनी फिरवली पाठ

शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याकडे पाठ फिरवली आहे.मागील दोन तीन वर्षे शेतकऱ्यांना अपेक्षित पीक विमा मिळाला नाही, त्यात अनेक केंद्र चालकाकडून होणारी लूट यामुळे शेतकरी पीकविमा भरण्याकडे पाठ फिरवताना दिसत आहे.

अनेक आपले सरकार केंद्रावर शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांकडून शंभर ते दोनशे सर्रास घेतले जात आहेत. याकडे तहसीलदार यांनी लक्ष द्यावे.

- सतीश राऊत, राष्ट्रवादी सोशल मीडिया, परतूर

आपले सरकार सेवा केंद्र चालकांना पीकविमा अर्ज भरण्यासाठी शासनाकडून ठरावीक रक्कम दिली जात आहे. केंद्र चालक शेतकऱ्यांची अडवणूक करून पैसे घेत असतील तर याबाबत कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

- भाऊसाहेब जाधव, उपविभागीय अधिकारी, परतूर

आपले सरकार सेवा केंद्र चालकांना पीकविमा अर्ज भरण्यासाठी शासनाकडून ठरावीक रक्कम दिली जात आहे. केंद्र चालक शेतकऱ्यांची अडवणूक करून पैसे घेत असतील तर याबाबत कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

- भाऊसाहेब जाधव, उपविभागीय अधिकारी, परतूर

Web Title: Jalna Partur Farmers Crop Insurance Hundred Rupees Charged Fraud At Service Center

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..