
जालना : वरिष्ठ विद्यालयाच्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे हडप करतात, अशी तक्रार देऊन विद्यालय बंद पाडण्याची धमकी देत सात संस्थाचालकांकडून ३९ लाखांची खंडणी घेणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केले. या तिघांना बुधवारी (ता. २५) न्यायालयाने ३० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.