Jalna Police Action: ब्लॅक फिल्म काचांवर पोलिसांचा प्रकाश; शहरासह जिल्ह्यात १६५ वाहनांवर कारवाई, लाखोंचा दंड
Black Film Drive: जालन्यात पोलिसांनी ब्लॅक फिल्म लावलेल्या वाहनांवर व्यापक मोहीम राबवली. वाहतूक सुरक्षेसाठी १६५ वाहनांवर कारवाई करत ₹१.३७ लाखांचा दंड आकारला. वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर पोलिसांचा इशारा, पारदर्शकता आणि सुरक्षा यावर भर.
जालना : चारचाकी वाहनांच्या काचांना ब्लॅक फिल्म लावून फिरणाऱ्यांवर शहर वाहतूक शाखेच्या वतीने गुरुवारी (ता. ३०) जिल्हाभरात मोहीम राबविण्यात आली. यामध्ये एकूण १६५ वाहनांवर कारवाई करत एक लाख ३७ हजारांचा दंड ठोठावण्यात आला.