
Jalna Rain
Sakal
जालना : राज्यात पावसाने हाहाकार माजवला असताना शेतकऱ्यांच्या नजरा राज्य शासनाच्या आर्थिक मदतीकडे लागल्या आहेत. अशात राज्य शासनाने मंगळवारी (ता.२३) राज्यात अतिवृष्टीने ३३ टक्क्यांपेक्षा अधीक बांधित झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीची मदत जाहीर केली. या यादीत मराठावाड्यातील चार जिल्ह्यांना मदत जाहीर झाली. मात्र, जालना जिल्ह्यातील जुलै आणि आॅगस्ट महिन्यातील पंचनाम्यांचे अहवाल प्रशासनाने उशिरा पाठवल्याने दुसऱ्या टप्प्यातील मदतीपासून जालना वंचित राहिला आहे.