
जालना : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम-मधील हल्ल्याच्या एक दिवसआधी बैसरण खोऱ्यात एका मॅगी स्टॉलवर दहशतवाद्यांच्या संशयास्पद हालचाली दिसल्याचा दावा जालना शहरातील पर्यटक आदर्श राऊत यांनी केला असून हल्ल्याचा कट पूर्वनियोजित होता, असा अनुभव त्यांनी नोंदविला आहे. याबाबत त्यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) मेल करून माहिती दिली आहे.