esakal | महाराष्ट्र बंदला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद नाही
sakal

बोलून बातमी शोधा

jalna

Jalna : महाराष्ट्र बंदला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद नाही

sakal_logo
By
उमेश वाघमारे : सकाळ वृत्तसेवा

जालना : उत्तर प्रदेश येथील लखीमपूर येथे भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याचा व योगी व मोदी सरकारच्या निषेधार्थ सोमवारी (ता.११) महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र, जालन्यात सोमवारी हा बंद न पळता व्यापाऱ्यांनी आपले दुकाने सुरू ठेवल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.

उत्तर प्रदेश येथील लखीमपूर येथे शेतकऱ्यांना भाजपच्या केंदीय मंत्र्यांच्या मुलाने गाडीखाली चिरडले. यात सात शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना लखीमपूर येथे जाण्यापासून रोखले. लखीमपूर येथील घटनेचा महाराष्ट्रातीन महाविकास आघाडी सरकार मधील नेत्यांनी निषेध करत योगी आणि मोदी सरकारवर टिकाचे झोड उठवली. त्यात सोमवारी (ता.११) लखीमपूर येथील घटनेसह योगी व मोदी सरकारच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.

मात्र, जालन्यातील व्यापाऱ्यांनी हा बंद पाळला नाही. सोमवारी सकाळपासून शहरातील मुख्य बाजार पेठेसह सर्व व्यापाऱ्यांनी नियमितपणे आपली दुकाने उघडली. तसेच शहरात ठिकठिकाणी हातगाडे ही लागले होते. दरम्यान सोमवारी सकाळी काँग्रेसच्या वतीने शहरातील मामा चौक येथे लखीमपूर येथील घटनेसह योगी व मोदी सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आले.

ग्रामीण भागात संमिश्र प्रतिसाद

महाविकास आघाडीने सोमवारी (ता.११) पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला जालना शहरात प्रतिसाद मिळाला नसला तर ग्रामीण भागात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. अंबड शहर, तालुक्यातील वडीगोद्री, मंठा शहर, भोकरदन तालुक्यातील वालसावंगी, परतूर तालुक्यातील आष्टी आदी ठिकाणी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

loading image
go to top