esakal | जालन्यात मुसळधार पावसाचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

rain

जालन्यात मुसळधार पावसाचा इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जालना : मुबंई येथील प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र यांनी दिलेल्या सूचनेनुसार ता.३ ते ता.७ सप्टेंबर कालावधीत जालना जिल्ह्यासाठी  येलो अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार ता. ०३ते ता. ५ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली असून ता.६ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ता.७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणासह  जनतेने खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

त्यामुळे नागरिकांनी विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा.  कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.

हेही वाचा: अमेरिकेने अफगाणिस्तान सोडताच तालिबानची आतशबाजी

तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तत्काळ पाण्यातून बाहेर पडा. आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. लोखंड शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे राहू नये, आदी सूचना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.

loading image
go to top