esakal | जालना झेडपी अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी 
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र.

जालना -  सध्या महाशिवआघाडीची सत्ता असलेल्या जालना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी (सर्वसाधारण) राखीव झाले आहे. या पदासाठी मुंबईत मंगळवारी (ता. 19) सोडत झाली. 

जालना झेडपी अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी 

sakal_logo
By
भास्कर बलखंडे

जालना -  सध्या महाशिवआघाडीची सत्ता असलेल्या जालना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी (सर्वसाधारण) राखीव झाले आहे. या पदासाठी मुंबईत मंगळवारी (ता. 19) सोडत झाली. 

आता अध्यक्षपद आपल्याकडे राहावे, यासाठी जिल्ह्यातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी येत्या काही दिवसांमध्ये मोर्चेबांधणी केली जाणार असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश टोपे यांनी सांगितले. 

अडीच वर्षांपूर्वी महाशिवआघाडी
जालना जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा असलेल्या भाजपला रोखण्यासाठी आधीच शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसने एकत्र येत अडीच वर्षांपूर्वी महाशिवआघाडी बनविलेली आहे. त्यामुळे येथील अध्यक्षपदी शिवसेनेचे अनिरुद्ध खोतकर, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सतीश टोपे यांची वर्णी लागली. त्यांचा अडीच वर्षांचा कलावधी 20 सप्टेंबर 2019 रोजी संपुष्टात आला होता; मात्र राज्य शासनाने त्यांना चार महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे 20 जानेवारी 2019च्या आसपास अध्यक्षपद व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा : जालना बनलाय गावठी बंदूकवाल्यांचा अड्डा?

राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीचे संकेत 
अध्यक्षपद आपल्याच पक्षाला मिळावे, यासाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस; तसेच कॉंग्रेस प्रयत्न करू शकतात. बहुमतासाठी आकड्यांची जुळवाजुळव सुरू केली जात आहे. महाशिवआघाडी कायम राहिल्यास जालन्यात नवीन समीकरणानुसार सत्ता मिळविण्याचा प्रयत्न होऊ शकेल, अशी चर्चा होत आहे. 

loading image
go to top